महायुतीचे शक्तीप्रदर्शन : जळगावसाठी स्मिता वाघ तर रावेरसाठी रक्षा खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव : प्रतिनिधी
महायुतीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर जळगावात महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखण्यात येत आहे. दरम्यान, आज महायुतीच्या उमेदवारांनी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जळगाव शहरात रॅली काढत महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी महायुतीचे असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले.

 

जळगाव मदारसंघासाठी अर्ज दाखल करताना स्मिता वाघ
रावेर लोकसभा मदारसंघासाठी अर्ज दाखल करताना रक्षा खडसे..

जळगावात महायुतीचे शक्तीप्रदर्शन
महायुतीचे उमेदवार आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाज, मंत्री अनिल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीतील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रॅलीत सहभागी झालेले महायुतीचे कार्यकर्ते
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment