तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा

जळगाव;- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्राच्या स्वरदा संगीत विभाग आयोजित स्वर्गीय तेजस नाईक स्मरणार्थ तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा रविवार 29 ऑक्टोबर रोजी जुना कॉन्फरन्स सभागृहात होणारा आहे.

शास्त्रीय संगीत हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं रुजू व्हावं आणि प्रत्येकाने ते आत्मसात करावं हे या शास्त्रीय स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. तेजसने त्याच्या छोट्याशा आयुष्यात संगीतावर विशेष करून शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम केलं आणि त्याची आठवण कायम राहावी याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते हे या स्पर्धेचे तृतीय वर्ष असून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता लहान गट आठ ते पंधरा वर्षे वयोगट आणि मोठा गट हा 16 ते 28 वर्ष या दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. लहान गटासाठी छोटा खयाल पाच मिनिटं सादर करणे आणि मोठ्या गटासाठी 12 मिनिटं बडा खयाल आणि छोटा खयाला सादर करावा लागतो या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आणि अधिक माहितीकरता स्वरदा संगीत विभाग प्रा.कपिल शिंगाने आणि प्रा.देवेंद्र गुरव यांच्याशी संपर्क साधावा.

 

बातमी शेअर करा !
#jalgaontate Level Classical Singing CompetitionTej Gandharva
Comments (0)
Add Comment