नागरिकांनो, घ्या काळजी…जिल्ह्यात ‘झिका’ व्हायरसचा नाही धोका, मात्र आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

जळगावः पुणे, मुंबई शहरात ‘झिका’ व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस ‘झिका’ व्हायरसचा कहर वाढत असल्याने शासनाने प्रत्येक जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्गदर्शक सुचना केल्या आहे. जिल्ह्यात या व्हायरसचा कुठला ही धोका नसला तरी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सावध राहण्याचा व योग्य काळजी घेण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहे. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. या विषाणुरोग मुख्यतः एडीस डासाव्दारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूंमुळे होतो. हा डास दिवसा चावतो. हा डास फ्लॅव्हीव्हायरस प्रजातीचा असुन तो एडीस डासांमार्फत पसरतो. जिल्हयात झिकाचा धोका नसला तरी एडीस डासापासून होणाऱ्या डेंग्युचा धोका असल्याने प्रशासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य केंदना मार्गदर्शक सुचना व अलर्ट राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे.

झिका आजाराची लक्षणे
झिका आजाराची ताप येणे, अंगावर रॅश येणे, डोळे येणे, सांधे व स्नायू दुखने, थकवा व डोकेदुखी अशी लक्षणे संबधीत रूग्णाला २ ते ७ दिवस राहतात. बहुसंख्य रूग्णांमध्ये कोणते ही लक्षणे आढळत नसली तरी झिकाची लक्षणे डेंग्युच्या लक्षणासारखीच आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
आरोग्य विभागाकडून गामिण भागात डासोत्पतीच्या स्थानांना प्रतिबंध घालणे, घरात पाणी साठ्याच्या ठिकाणी झाकण लावणे, वापरात नसलेल्या नारळाची कवटी, टायर, भंगार साहित्य काढून टाकणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडणे अशा सुचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment