तापीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

भुसावळची घटना, तीन जणांना वाचवण्यात यश

भुसावळ : प्रतिनिधी 

शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी दोघा युवकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. अंकुश ठाकूर ( वय १८) व दानिश शेख (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. अंकुश आणि दानिश यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी सायंकाळी पोहण्यास गेले होते. पोहताना दोन जण पाण्यात बुडून मरण पावले तर तीन जणांना वाचवण्यात तेथील पोहणाऱ्यांना यश आले. दोन्ही युवकांना येथील डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. डॉ. राजेश मानवतकर यांनी दोन्ही युवकांच्या छातीला पंपिंग केले. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दोन्ही  युवकांना मृत घोषित केले. दोन्ही युवकांना रात्रीच ट्रॉमा केअर सेंटरला नेण्यात आले.

याप्रकरणी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा !
बुडून मृत्यूभुसावळ
Comments (0)
Add Comment