विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ

 

जळगाव :-जिल्हा विधि सेवा प्राधिरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला.

या शिबिरात समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी यांनी दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनाबद्दल माहिती दिली. विधि सेवा प्राधिकरणाच्या विधि सहायक भारती कुमावत यांनी शारिरीक व्याधीपेक्षा आपली मानसिकता कशी प्रबळ ठेवायची. दिव्यांग शरीराने जरी विकलांग असले तरी मनाने मात्र खंबीर आहात.‌आपल्या सर्वांसाठी कायदयाची द्वारे नेहमी खुली आहेत.असे श्रीमती कुमावत यांनी सांगितले.

इंडियन रेडक्राॅस सोसायटीचे गणी मेमन, अॕड ऐश्वर्या मंत्री यांनीही दिव्यांगांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वितेसाठी दिंव्याग पुनर्वसनचे श्री.गणेशकर, उडान चे हर्षली चौधरी व रक्त पेढीतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
०००००००००

बातमी शेअर करा !
#jalgaon
Comments (0)
Add Comment