बोदवड – रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांनी मंगळवारी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड तालुक्यात भेटीगाठी घेतल्या. बोदवड तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेले निमखेडी श्री पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.
गावात घराघरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महिलांनी औक्षण केले. तर नागरिकांनी श्रीराम पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ग्रामस्थांचे असलेले प्रेम पाहून उमेदवार पाटील भारावून गेले. यावेळी त्यांनी गावाला ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच बोदवड तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा देखील आपण प्रयत्न करू असे यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना सांगितले. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत हनुमानाचे हनुमान जयंतीच्या निमित्ताने दर्शन घेत मतदारांच्या भेटीला सुरुवात केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्रभैय्या पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, माफदाचे प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख विनोद पाडर , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेना (उबाठा ) पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन खोडके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत पाटील, मुक्ताईनगर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष माजी सभापती किशोर गायकवाड, माजी सभापती गणेश पाटील, विजय चौधरी, श्याम पाटील, सखाराम पाटील, वीरेंद्रसिंग पाटील, डॉ अविनाश घाटे, प्रवीण जैन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोदवड तालुक्यातील सिरसाळा, चिंचखेड, नाडगाव, नांदगाव, राजुर, वरखेड खुर्द, ऐनगाव, घाणखेड येथे भेटी देत मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. निमखेडीला स्मार्ट व्हिलेज बनवणार : श्रीराम पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे निमखेडी मूळ गाव आहे. येथे भेट दिल्यावर ग्रामस्थानी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यामुळे भारावलेल्या श्रीराम पाटील यांनी गावाचे ऋण फेडण्यासाठी गावाला स्मार्ट व्हिलेज बनविण्याचा निर्धार ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी रमेश सुरंगे, विकास पाटील, तुकाराम पाटील, पंजाब वाघ, संतोष पाटील, संतोष निकम, गोपाळ पाटील, सौ संगीता विलास पाटील, आत्माराम पाटील, सुरेंद्र सर, गुणवंत गलवाडे, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.