जळगाव | प्रतिनिधी
श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली.
पारस राका यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथि डीएसपी डॉक्टर रेड्डी, माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी,अशोकभाऊ जैन, रजनीकांत कोठारी, अजय ललवानी जन्म कल्याणक समिति चे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड़, जितेंद्र चोरडिया, ललित लोडाया, चंद्रशेखर राका , आदर्श कोठारी , श्रेयस कुमट, नितिन चोपड़ा, विनय पारख, अनीश शहा , प्रदीप मुथा, प्रवीण पगारिया , चंद्रकांता मुथा, प्रवीण छाजेड़ , मनीष लुंकड़ , मीनल जैन आदि उपस्थित होते. पागरिया ऑटो कडून नवीन बजाज चेतक वाहन उपलब्ध करून दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी साहेब यानी मतदान टक्का वाढ़ावा आणि निर्भय पणे मतदान करावे म्हणून सर्व उपस्थितांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर रैली ला आरंभ झाला. मोठ्या संख्येने उत्साहाने रैलीत दुचाकी स्वार सहभागी झाले होते. दुचाकीस्वार मतदार जागृती, विश्र्वशांती आणि पर्यावरण संवर्धन होण्यासाठी फलक दर्शवित होते. विविध वेशभुषा आणि वाहन सजावट करून महिला मंडळ आकर्षणाचे केंद्रबिंदु होते.
कार्यक्रमास सकल दिगंबर जैन समाजाचे सर्वश्री नेमीचंद जैन, राजू भाई शहा , सुधीर बाजल, आनंद चांदिवाल, अनीश चांदीवाल, समीर, वृषभ शाह, भावेश आंबेकर, नरेंद्र जैन, प्रशांत चांदीवाल, विजय आंबेकर , राहुल जैन, सौरभ चांदीवाल, दीपक कोठड़िया, सुशील कोठड़िया, गिरीश कोठड़िया, रितेश चांदीवाल, दीपक जैन यानी परिश्रम घेतले.