DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (वय ४५, रा. सदोबा नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी रात्री ड्युटी आटोपल्यांनतर ते (एमएच १९, डीपी ४६६०) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच १८, बीजी २९३७) क्रमांकाचा ट्रक नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेल्याने ते गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी ट्रकच्या पुढील दोन्ही चाकांमध्ये अडकल्याने ट्रक चालकाने ती सुमारे ५० ते ६० मीटरपर्यंत फरपटक नेली. अपघातग्रस्त ट्रक हा रस्त्याच्या मधोमध थांबलेला असल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, पोहेकॉ शरद भालेराव, गिरीश शिंदे, संजय महाजन, पोकों सागर भिडे हे घटनास्थळी पोहचले.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.