DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

BREAKING: राज्यात करोनाची नवीन नियमावली जाहीर, जाणून घ्या काय बंद काय सुरु?

मुंबई । वृत्तसंस्था 
देशात करोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे. देशासह महाराष्ट्रातही करोनाच्या दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 10 जानेवरीच्या मध्यरात्रीपासून हे नियम लागू होणार असून 15 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू असतील.

 

असे असतील नवीन नियम –

 • – दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी
 • -सलून, खासगी कार्यालये, थिएटर क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
 • -सार्वजनिक वाहतूकीत दोन्ही दडोस घेतलेल्यांनाच परवानगी.
 • -शाळा, काॅलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
 • -हाॅटेल, रेस्टाॅरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु राहतील,
 • -स्विमींग पूल, स्पा, जिम पूर्णपणे बंद
 • -मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्णत: बंद
 • -रात्री 11 ते सकाळी पाच वाजेवर्यंत असणार नाईट कर्फ्यू. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित फिरू शकणार नाहीत.
 • -लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्ती, कार्यक्रमांसाठी 50 लोकच उपस्थित असतील.
 • -शाळा, खासगी क्लासेस ऑनलाइन पद्धतीने सुरु राहतील.
 • -शाॅपिंग माॅल रात्री 10 ते 8 वाजेपर्यंत बंद असतील.
 • -मालवाहतूकीवर कोणतीही बंधने नाहीत.
 • -लोकल वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 1लाख 41हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात गेल्या 24 तासात 41,434 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. 9,671 उपचारानंतर बरे झाले असून दिवसभरात 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात ओमायक्राॅन रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.