जळगाव ग्रामीणमधील नागरिकांचा सेनेत प्रवेश
जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील हजारो नागरिकांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. यात शिरसोली, ममुराबद, भोने, अहिरे बिलवाडी, लमांजन गारखेडा, चावलखेडा, सुभाषवाडी कुऱ्हाळदा, भागपूर, लोणवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला. यासह पाळधी येथील मुस्लिम पंच कमिटीनेही महायुतीसोबत असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाला माजी सभापती कैलास चौधरी, मुकुंदराव नन्नवरे, संजय पाटील, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, दीपक भदाणे. जि.प. सदस्य गोपाळ पाटील, शाम कोगटा, मनोज चौधरी, रोहित कोगटा, महानगर प्रमुख संतोष पाटील, ओबीसी अध्यक्ष राजेंद्र पाटील, नंदू पाटील, धोंडू जगताप, बंडू पाटील, भैया मराठे, सरपंच विजू पाटील, भागवत शेठ, पवन पाटील, कैलास सोनवणे, किशोर निकम, शुभम पाटील, गोरख पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.