DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चला… विद्यार्थ्यांना लढ म्हणूया… त्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करुया !

सर्व चाळीसगाव वासियांना... सस्नेह नमस्कार !

शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे…म्हटली तर अगदी ‘सायकल’ सारखीच. पायंडल मारलं नाही तर पुढे जाता येणार नाही. अर्थात शिकण्याची अफाट इच्छाशक्ति आहे. पायात बळही आहे. मात्र सायकल नाहीए. अशीही एक स्थिती आपल्या समाजात आहे.
विशेषतः हलाकीच्या परिस्थित गुजराण करणा-या असंख्य कुटूंबांमध्ये मुलेही शिक्षणासाठी संघर्ष करतात. मुलींना विविध योजनांसह सामाजिक संघटनांकडून ‘सायकल’ बळ मिळते. मुलांसाठी अजून तरी अशी योजना नाही.
राज्यातील महायुतीच्या सरकार मधील एक आमदार म्हणून आपणही पदरझळ सोसून काही तरी करावं. अशा मुलांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना लढ म्हणावं…मी तुझ्यासोबत आहे, असं त्यांना प्रामाणिकपणे सांगावं. अशा निर्भेळ भावनेतूनच स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती योजना अंतर्गत १२०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे.
मंगळवार दि.१२ सप्टेंबर रोजी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अशोकभाऊ जैन व अनेक मान्यवरांच्या प्रेरणादायी उपस्थितीत मोफत सायकल वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे..
यासाठी ३ ते ५ किमी पायी प्रवास करीत शाळा व महाविद्यालये गाठणा-या विद्यार्थ्यांची यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पक्ष, जात – पात, गट – तट, धर्म – पंथ या सर्वच ‘राजकीय’ अटी – शर्ती पुसून टाकतांना निवड समितीने अत्यंत पारदर्शीपणे विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
इयत्ता ७ वी ते १० पर्यंतच्या अनाथ, दिव्यांग, ऊसतोड मजूर, कष्टकरी, कामगार, शेतमजूर पालकांच्या पाल्यांचा यात समावेश आहे. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेतांना त्यांच्या कुटूंबात परिस्थितीने निर्माण केलेले ताणेबाणे…शिक्षणासाठी त्यांचा असलेला संघर्ष अवस्थ करुन जातो तर त्यांची शिकण्याची अपार जिद्द नव्या उमेदीची वात पेटवून जाते.
विद्यार्थ्यांची अवघड शिक्षणवाट सोपी करण्याचा हा सोहळा माझ्यासाठी नामदेवाच्या पायरीवर डोक ठेवून भाळी समाधानाचा बुका लावण्यासारखा प्रासादिक आहे.
आपणही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावा. ही नम्र विनंती.

आमदार मंगेश रमेश चव्हाण

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.