DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, १७ लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत दुचाकीवरून हेल्मेटधारी दोघा तरुणांनी कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून चोरटे आल्याचा संशय असून जिल्हाभरात चोरट्यांना पकडण्यासाठी यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.

 

जळगावच्या कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता बँक उघडताच नियमित कामात कर्मचारी गुंग असतानाच गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. कोयत्यासारखे धारदार शस्त्राने त्यांनी कर्मचार्‍यांना धमकावत आधी बँक व्यवस्थापकावर हल्ला चढवल्याने व्यवस्थापकांच्या मांडीला मोठी जखम झाली तर काही कळण्याआत दरोडेखोरांनी बँकेतील 12 ते 15 लाखांची रोकड बॅगेत भरून काही क्षणात पळ काढला.

गुरुवारी सकाळच्या वेळी फारशी ग्राहकांची वर्दळ नसल्याने चोरट्यांनी पाळत ठेवून दरोडा फत्ते केला. दरोड्याची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्‍यांनी भेट देत माहिती जाणली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. बँकेवरच दरोडा पडल्याने नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.