डॉ.संभाजीराजे पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार !
पारोळा : पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातून डॉ. संभाजीराजे पाटील उद्या, सोमवारी (ता. २८) सकाळी ११:०० वाजता रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.
पारोळा येथील श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन सरळ बाजार पेठ मार्गे छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक, राणी लक्ष्मीबाई स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणीं महापुरुषांना अभिवादन करून असंख्य कार्यकर्त्यासह एरंडोलकडे रवाना होणार आहेत. तसेच एरंडोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, अमळनेर दरवाजा, परदेशी गल्ली,भगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मरिमाता म्हसावद नाका, वीर एकलव्य स्मारक, मार्गे तहसील कार्यालय येथे कार्यकर्तेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
तरी मतदार संघातील बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपली उपस्थिती द्यावी असे एरंडोल, पारोळा, भडगांव, कासोदा गावातील नागरिकांना डॉ. संभाजीराजे आर पाटील यांच्यातर्फे जाहीर आव्हान करण्यात आले आहे.