DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

विटनेरची अख्खी ग्रामपंचायत शिवसेनेत : गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा खिंडार !

वावडदा / जळगाव : म्हसावद येथिल प्रचार दौरा आटोपल्यावर विटनेर येथे ग्रा.पं.चे विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, सोसायटीचे चेअरमन तथा माजी सरपंच ललित साठे, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे नेते तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तुत्व व झंझावाती नेतृत्वामुळे अक्ख्या ग्रामपंचायतीने शिवसेनेत प्रवेश करून गाव एकजुटीचे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे पुन्हा दिसून आले.

यांचा झाला प्रवेश
विटनेर हे गाव राजकीय दृष्ट्या निवडणुकीचे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्यामुळे त्या कालखंडात विटनेर येथे प. स. सभापती, उपसभापती अशी विविध पद मिळाली होती. विद्यमान सरपंच स्नेहा ललित साठे, जळगाव पं. स. चे माजी सभापती हरिभाऊ साठे यांचे चिरंजीव तथा विकास सोसायटीचे माजी चेअरमन व माजी सरपंच ललित साठे, विद्यमान विकास सोसायटी चेअरमन व माजी सरपंच नितीन ब्रह्मेच्या (जैन ), तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबू दादा पिंजारी,तसेच ग्रा.पं. सदस्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पालकमंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला तसेच म्हसावद येथिल भोई समाजाचे बापू भोई, युवराज धोत्रे, दिलीप शिरोळे , मोहम्मद शहा, रामा धोत्रे , प्रकाश धोत्रे, गोविंदा शिरोळे, लक्ष्मण धोत्रे, जितेंद्र भोई, हिरामण धोत्रे, गोविंदा शिरोळे, अजय भोई, अनिल शिरोळे, उदय धोत्रे, रोहिदास धोत्रे, मंगेश भोई, रामू शिरोळे , अशोक शिरोळे, संतोष धोत्रे, पिराजी शिरोळे, काढू धोत्रे, राहुल शिरोळे, भास्कर शिरोळे, अशोक शिरोळे, मुकेश शिरोळे, दशरथ धोत्रे, संतोष धोत्रे व सखाराम धोत्रे अश्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती साहेबराव वराडे, लाडक्या बहिण योजनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, पी. के पाटील , उपजिल्हा प्रमुख रवी कापडाने, अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक नारायण चव्हाण, महेंद्र पाटील, बापू धनगर, गोविंदा पवार व अनिल भाऊ सोनवणे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.