मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर
चाळीसगावात उन्मेष पाटील तर पाचोरामध्ये वैशाली सूर्यवंशींना संधी
जळगाव /मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. चाळीसगाव मतदारसंघासाठी उन्मेष पाटील तर पाचोरा-भडगाव मतदारासंघातून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यादीत 65 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या फोडाफोडीनंतर जनता कोणाच्या बाजूने आहे, हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे म्हटले जात आहे. याआधी महायुतीच्या तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने आपली यादी जाहीर केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार
१. उन्मेष पाटील – चाळीसगांव, २. वैशाली सूर्यवंशी – पाचोरा, ३. सिद्धार्थ खरात – मेहकर, ४. नितीन देशमुख – बाळापूर, ५. गोपाल दातकर – अकोला पूर्व, ६. डॉ. सिद्धार्थ देवळे – वाशिम, ७. सुनील खराटे – बडनेरा, ८. विशाल खरवटे – रामटेक, ९. संजय देरकर – वणी, १०. एकनाथ पवार – लोहा११. डॉ. संतोष टारफे – कळमनूरी, १२. डॉ. राहुल पाटील – परभणी, १३. विशाल कदम- गंगाखेद
१४. सुरेश बनकर- सिल्लोड, १५. उदयसिंह राजपुत – कवड, १६. किशनचंद तनवाणी- संभाजीनगर मध्य, १७. राजु शिंदे- संभाजीनगर प.
१८. दिनेश परदेशी- वैजापूर, १९. गणेश धावक- नांदगांव, २०. अद्वय हिरे- मालेगांव बाह्य, २१. अनिल कदम – निफाड, २२. वसंत गीते- नाशिक मध्य, २३. सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम, २४. जयेद्र दुबळा – पालघर, २५. डॉ. विश्वास दळवी – बोईसर, २६. महादेव घाटक- भिवंडी ग्रामीण, २७. राजेश वानखेडे- अंबरनाथ, २८. दिनेश म्हात्रे – डोंबिवली, २९. सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण, ३०. नरेश मणेरा- ओवळा – माजिवाडा , ३१. केदार दिघे – कोपरी – पाचपाखडी, ३२. राजन विचारे – ठाणे, ३३. एमके मधवी – ऐरोली, ३४. उद्देश पाटकर – मागाठाणे, ३५. सुनील राऊत – विक्रोळी, ३६. रमेश कोरगांवकर – भांडुप पश्चिम, ३७. अनंत नर – जोगेश्वरी पूर्व, ३८. सुनील प्रभू – दिंडोशी, ३९. समीर देसाई – गोरेगाव, ४०. ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व, ४१. प्रकाश फतरपेकर – चेंबूर, ४२. प्रविणा मोजरेकर – कुर्ला, ४३. संजय पोतनीस – कलिना, ४४. वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व, ४५.महेश सावंत – माहीम, ४६. आदित्य ठाकरे – वरळी, ४७. नितीन सावंत – कर्जत, ४८. मनोहर भोईर – उरण, ४९. स्नेहल जगताप – महाड, ५०. शंकरराव गडाख – नेवासा, ५१. बदामराव पंडित – गेवराई, ५२. कैलास पाटील – धाराशीव, ५३. राहुल पाटील – परांडा, ५४. दिलीप सोपल – बार्शी, ५५. अमर पाटील – सोलापूर दक्षिण, ५६. दीपक साळुंखे – सांगोले, ५७. हर्षद कदम – पाटण, ५८. संजय कदम – दापोली, ५९. भास्कर जाधव – गुहागर, ६०. बाळ माने – रत्नागिरी, ६१. राजन साळवी – राजापूर, ६२. वैभव नाईक – कुडाळ, ६३. राजन तेली – सावंतवाडी, ६४. केपी पाटील – राधानगरी
६५. सतयजित पाटील – शाहूवाडी