DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार!

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५०,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार राज्य सरकार या अतिरिक्त निधीचा भार उचलणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील घरकुलांसाठी मिळणाऱ्या निधीची एकूण रक्कम २.१० लाख रुपये होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सरकारचा २० लाख घरकुल पूर्ण करण्याचा संकल्प
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी धाराशिव येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले की, राज्य सरकारने वर्षभरात २० लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. पहिल्या टप्प्यात १० लाख घरकुलांसाठी पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला आहे.

४५ दिवसांत १००% घरकुलांना मंजुरी
राज्य सरकारला देशातील सर्वाधिक २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, १०० दिवसांच्या योजनेत पहिल्या ४५ दिवसांत १००% घरांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत १०.३४ लाख घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून, उर्वरित १० लाख घरकुलांसाठी पुढील १५ दिवसांत निधी वितरित केला जाईल, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

‘सर्वांसाठी घरे’ मिशनअंतर्गत ग्रामीण भागावर भर
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांतील घरांची कमतरता भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पात्र लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतर्गत अधिकाधिक नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.