सरकारची गोरगरिबांना दिवाळी भेट, रेशनिंगवर 100 रुपयांत 4 वस्तू ; पण हातात मिळणार कधी ? पहा..
दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स : सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकरने साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल अशा 4 वस्तू 100 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली असताना नागरिकांना सरकारच्या घोषणेनुसार चारही शिधा वस्तू रेशन दुकानात उपलब्ध नाहीत, तसेच रेशन दुकानात सॉफ्टवेअर अपडेट झालं नसल्यानं बऱ्याच जणांना पुन्हा येण्यास सांगितलं जातं आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिवाळी जवळ आल्याने गोरगरीब जनतेला सरकारने देऊ केलेला शिधासंच कधी मिळणार ? असा सवाल केला होता. आता यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली दिली आहे.
हा शिधासंच 20 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील जिल्हा पातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहोचवण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. दुसरीकडे त्याचवेळी मंत्री चव्हाण हे राज्यातील रेशनिंग वितरण व्यवस्थेचा आढावा घेतेदरम्यान त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, दिवाळीचा सण लक्षात राज्य सरकारने 4 ऑक्टोबरच्या बैठकीत शिधापत्रिकाधारकांना अवघ्या 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, दिवाळी तोंडावर आली तरी नागरिकांना सरकारच्या घोषणेनुसार नागरिकांना शिधा वस्तू मिळालेल्या नाहीत. मात्र, या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचवण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 19 आणि 20 ऑक्टोबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हा पातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील. त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.
राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख, प्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) मधील सुमारे 9 लाख शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 1 शिधा जिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे . असे एकूण 1 कोटी 71 लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना हे शिधाजिन्नस संच 100 रुपयात वितरित करण्यात येणार आहेत.
279 रुपयांचा शिधासंच 100 रुपयांत
राज्यातील गोरगरीबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली. 9 निविदा प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी 6 कंपन्या पात्र ठरल्या. त्यापैकी 5 कंपन्यांनी सहभाग घेतला. या निविदांमध्ये सर्वात कमी दर 279 रुपये असलेल्या महाराष्ट्र स्टेट को -ऑ. कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड मुंबई यांना हे काम देण्यात आले आहे. गोरगरीबांना हा शिधासंच 100 रुपयांत देणार असून राज्य सरकारने यासाठी 513 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.