DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

लोकसभेला गुलाबराव देवकरांनी भाजपला मदत केली

जळगाव : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या टिका- टिप्पणी, गौप्यस्फोट, हेवे-दावे यांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.आपल्या तडाखेबंद भाषणासाठी ओळखले जाणारे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील जळगाव आणि रावेर मतदारसंघाच्या निकालावर मोठं भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतली होती.जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मदत करण्यासाठी सुद्धा गुलाबराव देवकर यांनी मंगेश चव्हाण यांचा चहा पिला. देवकर यांना चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा खूप आवडत असल्याची मिश्किल टिप्पणीही मंत्री पाटील यांनी केली आहे. जळगावात निवडणुकीवेळी देवकर दिसले नाहीत. ते फक्त रावेर मतदारसंघातच फिरले असल्याचा विधानही गुलाबराव पाटील यांनी केला.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.