गुलाबराव देवकरांना अजित पवार गटात ‘नो एंट्री’?
जळगाव : गुलाबराव देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर देवकरांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईत झालेल्या बैठकीत देवकर यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा हि केली होती. या भेटीदरम्यान, देवकरांनी अजित पवार गटात सामील होण्याची तयारी दर्शवली असून, तटकरे यांनीही त्याच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता व्यक्त केली होती.
आम्ही अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, ते आमच्यापुढे अनेक समस्या निर्माण करत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत आपण सत्तेत सहभागी व्हावे, अशी कार्यकर्त्यांचे इच्छा हे. असं देवकर यांच्याकडून सांगण्यात आलं होत.
कार्यकर्त्यांचा विरोध
परंतु गुलाबराव देवकरांना पक्षात घेण्यास राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, श्याम पाटील, नाटेश्वर पवार, अरविंद मानकरी, रमेश पाटील, पुष्पा महाजन, कल्पना अहिरे यांच्यासह ग्रामीणचे पदाधिकारी यांनी पवार यांची भेट घेऊन गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नका अशी मागणी केली. यावर अजित पवार यांनी कोणालाही पक्षात घेतले जाणार नाही अशी ग्वाही दिली.
देवकरांचं शिष्टमंडळ माघारी
गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली. भेटी दरम्यान दोघांना अजित पवारांनी सध्या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते हताश होत पुन्हा जळगावकडे रवाना झाले.