DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेर येथील पीकअप शेडचे लोकार्पण

मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप

अमळनेर : येथील बस स्थानकाशेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून पिकअप शेड उभारले असून त्याचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र टॅक्सी महासंघ मेळाव्याचे ही आयोजन अमळनेरात करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी टॅक्सी स्टँड ही मोठी भेट मंत्री पाटील यांनी दिली असल्याचे सांगितले. तालुक्यातील प्रत्येक घटकासाठी व विशेष करून पाडळसरे धरणासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्या, असे आवाहन चौधरी यांनी केले. या वेळी जळगाव युनियनचे अध्यक्ष रजाक गनी खान, देविदास देसले यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वेळी मंत्री अनिल पाटील यांचा युनियनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी अमळनेर युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर, धुळे युनियनचे अध्यक्ष शिवाजी शेंडे, शहादा येथील युनियनचे अरुण चौधरी, पारोळा येथील युनियनचे आबा चौधरी, चोपडा युनियनचे राजू पाटील तसेच अमळनेर युनियनचे राजेंद्र परदेशी, ईश्वर पाटील, ईश्वर देशमुख, सुनीलदत्त रणधीर, मेहमूद खा पठाण, गणेश महाजन, प्रकाश पवार, विठ्ठल शिंदे, कैलास पाटील, नितीन पाटील यासह सर्व चालक व मालक, सदस्य, प्रवासी बांधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.