जळगावात बांगलादेशातील हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात न्याय यात्रा
जळगाव : बांग्लादेशात जिहादी कट्टरवाद्यांनी अस्थिरता निर्माण केली असून त्या देशातील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन यांच्यासह अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हे अत्याचार थांबवावे, या मागणीसह अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून न्याय यात्रा धरणे आंदोलन करण्यात आले.
सकल हिंदू समाजातर्फे मानवधिकार दिनी बांगलादेशात सुरु असलेल्या हिंदूंवरील क्रूर जिहादी अत्याचारविरोधात न्याय यात्रा
आज मंगळवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाज जळगाव यांच्या वतीने बांगलादेश हिंदू यात्रा हे धरणे आंदोलन करण्यात आले. बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित जहादी अत्याचार थांबावेत यासाठी सकल हिंदू समाज आज हजारोंच्या संख्येने एकत्रित झाला होता. यावेळी बांग्लादेशात हिंदूंनो होणाऱ्या अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी परमपूज्यनीय महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपुर, पार्थ सारथी दास प्रभू इस्कॉन अध्यक्ष जळगाव, स्वामी चिंतन प्रिय हास जळगाव, ह भ प गजानन महाराज वरसाडेकर, योगेश्वर गर्गे विश्व हिंदू परिषद, श्री राजेश आबा पाटील चोपडा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विभाग संघचालक अविनाश नेहते विभाग कार्यवाह जळगाव, ललित भैय्या चौधरी विश्व हिंदू परिषद, हितेश पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जिल्हा कार्यवाह, हरीश मुंदडा विश्व हिंदू परिषद, देवेंद्र भावसार विश्व हिंदू परिषद, राकेश लोहार विश्व हिंदू परिषद, राजेश ज्ञाने, समीर साने आदी उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर २०२४ रोजी इस्कॉन या संबंधीत चिन्मय कृष्ण महाराज याना खोट्या गुन्ह्यात अडकवून जबदरस्तीने व्यणि हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे . अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले. याचबरोर वर असेही लक्षात आले आहे की, चिन्मय कृष्ण महाराजांना मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, कारागृहात त्यांना योग्य ती औषधीपचार आणि शाकाहारी भीजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. याबाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लतंचन करणा-या आहेत. चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी ठेवल्याचे समजते. ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जिवीतास धोका निर्माण करणारी असल्याचे निवेदनात सांगितले आहे.