DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे. या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, अमित शहा यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. राज्यातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांचीही नावे भाजपच्या स्टार यादीमध्ये आहेत.

केंद्रातील स्टार प्रचाराकांची नावे
1) नरेंद्र मोदी
2) जे.पी. नड्डा
3) राजनाथ सिंह
4) अमित शाह
5) नितीन गडकरी
6) योगी आदित्यनाथ
7) डॉ. प्रमोद सावंत
8) भुपेंद्र पटेल
9) विष्णू देव साई
10) डॉ. मोहन यादव
11) भजनलाल शर्मा
12) नायब सिंग साईनी
13) हिमंता बिस्वा सर्मा
14) शिवराज सिंह चौहान
15) ज्योतिरादित्य सिंधिया
16) स्मृती इराणी
17) शिव प्रकाश
18) भूपेंद्र यादव
19) अश्विनी वैष्णव
20) पियुष गोयल

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?
1) देवेंद्र फडणवीस
2) विनोद तावडे
3) चंद्रशेखर बावनकुळे
4) रावसाहेब दानवे
5) अशोक चव्हाण
6) उदयनराजे भोसले
7) नारायण राणे
8) पंकजा मुंडे
9) चंद्रकांत दादा पाटील
10) आशिष शेलार
11) सुधीर मुनगंटीवार
12) राधाकृष्ण विखे पाटील
13) गिरीश महाजन
14) रविंद्र चव्हाण
15) प्रवीण दरेकर
16) अमर साबळे
17) मुरलीधर मोहळ
18) अशोक नेते
19) डॉ. संजय कुटे
20) नवनीत राणा

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.