आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई;- आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घ्यावी असे आदेश दिले आहेत. मे महिन्यात आम्ही निर्णय दिला होता. आता विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेऊ शकत नसतील तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असं न्यायालयाने स्पष्ट सुनावलंय.
जाहिरात
विधानसभा अध्यक्षांनी ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात होईल असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टी आहे. त्यानंतर एक महिना आहे. ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घ्या. आम्ही विधानसभा अध्यक्षांना अनेक संधी दिल्या असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले.