DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात

सावदा – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा येथे १६ ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसमवेत पालकही दांडिया, गरबा नृत्याचा आनंद घेत आहे.

सोमवार दिनांक १६ रोजी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्या प्रमुख उपस्थीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पालकवर्गही उपस्थीत होते. नवरात्रोत्सवात उत्कृष्ट दांडिया, गरबा खेळणार्‍यांना डॉ.केतकी पाटील यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांमधूनही गरबा क्वीन आणि किंगची निवड करण्यात आली असून त्यांनाही बक्षीस देण्यात आले.

पहिल्या दिवशी इयत्‍ता पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आणि पालक तर दुसर्‍या दिवशी सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी गरबा दांडिया नृत्याच्या आयोजनात प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. मंगळवार दिनांक १७ रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते देखील उत्कृष्ट गरबा, दांडिया खेळणार्‍यांना पारितोषिक देण्यात आले. यात शाळेचे शिक्षक , विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अनमोल सहकार्य केले. शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. बाळ गोपाळांसमवेत हा नवरात्रोत्सव शाळेत परंपरेनेे उत्साहात सुरु आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.