DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ मेळावा ऐतिहासिक होईल – ना. गिरीश महाजन

जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधला.
बजत गटांच्या माध्यमातून अनेक महिला या लखपती झाल्या महिला बचत गटांना जे कर्ज दिले ते त्यांनी नियमित परत केले. केंद्र व राज्याने ज्या संधी उपलब्ध करुन दिल्या त्याचे त्यांनी सोनं केले. राज्यात लाडकी बहिण योजनांचा अनेक महिलानी लाभ घेतला, ज्या महिला भगिनींनी या योजनेचा अजून पर्यंत घेतलेले नाही त्यांनी आपली नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनाच्या लोककल्याणकारी अनेक योजना आहेत. त्यात शेतकऱ्यांना विज बिल माफ,महिलांना 3 गॅस सिलेंडर, अनेक ठिकाणी रस्ते दळणवळणची अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा देशात उपलब्ध झालेल्या आहेत.केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून जे विकास लाभाच्या योजना भेटत आहे यांनी विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही केंद्र व राज्य सरकारचे चांगलं काम सुरू आहे, मात्र विरोधक या मुळे भयभीत झाले आहेत. सरकार विरोधात नेरेटिव सेट करून बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत यांना योग्य उत्तर देण्याची आता वेळ आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे,आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,उज्वलाताई बेंडाळे, ज्ञानेश्वर जळकेकर, माजी खासदार उल्हास पाटील, राधेश्याम चौधरी,केतकी पाटील, डॉक्टर राजेंद्र फडके, अजय भोळे, देवयानी ठाकरे, अशोक कांडेलकर, माजी महापौर भारतीताई सोनवणे, ज्योती निंभोरे, वैशाली कुलकर्णी,महेश जोशी, रेखा कुलकर्णी,संगिता गवळी,सचिन पानपाटील. राकेश पाटील, हिरालाल कोळी, रेखा वर्मा, प्रसिद्धी प्रमुख मुविकोराज कोल्हे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.