पंजाब बंदचा रेल्वेला फटका; १५७ गाड्या रद्द
पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आज बंदची घोषणा केली आहे. या बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. अनेक शहरांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या बंदमुळे आज तब्बल २२१ रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहेत. तर जवळपास १५७ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर जवळपास ५० रेल्वेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. (Punjab Bandh)
सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंजाब बंद
पंजाब बंदच्या पार्श्वभूमीवर महामार्ग आणि रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. बंदच्या घोषणेमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंजाब बंद राहणार आहे. या वेळेत लोकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होणार नाहीत.
अनेक रेल्वेंवर पंजाब बंदचा प्रभाव
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने आपल्या अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक रेल्वेंचे मार्ग आणि वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार आहे.
PRTC रोडवेज सेवेचा पंजाब बंदला पाठिंबा
पंजाब शेतकरी आंदोलनादरम्यान रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे. या दरम्यान PRTC ने पंजाब बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या काही संघटनांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. ज्यामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत दूध, फळे, भाजीपाला सारख्या गोष्टींच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.