DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रीया सिवाकुमार साकारणार ‘मिसाईल मॅन’; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : ‘जय भीम’ या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता सुरिया शिवकुमार लोकांच्या मनात असा काही वसला आहे कि त्याला स्क्रीनवर पाहायला सगळे नेहमीच आतुर असतात. यामुळे ज्यांनी ‘जय भीम’ चित्रपट पाहिला आहे त्यांना हा सुरिया कोण आहे..? असा प्रश्न पडणे शक्यच नाही. IMDb कडून ९.५ रेटिंग मिळवणारा सुरिया अर्थात टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सर्वानन सिवाकुमार येत्या काळात ‘मिसाईल मॅन’च्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भूमिका तो साकारणार आहे अशी कुणकुण लागली आहे. तास एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

सुरियाने आतापर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती असणाऱ्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. कधी भावनिक तर कधी कॉमिक तसेच कधी धडाडीच्या भूमिकांमधून सुरिया अनेकदा आपल्या समोर आला आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. एखादी भूमिका अंगवळणी आणून साकारण्याची त्याची कला त्याला नेहमी वेगळेपण देते. ‘जय भीम’मध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा सुर्या अनेकांना भावला. कित्येकांना तो आपलासा वाटला. यानंतर मध्यंतरी प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक कमल हासन यांच्या ‘विक्रम’ चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिकादेखील अव्वल साकारली. यासाठी कमल हासन यांनी त्याला मोठी भेटवस्तुही दिली होती. त्यामुळे त्याची प्रत्येक भूमिका पाहता कलाम यांची भूमिका देखील तो व्यवस्थित पेलू शकतो असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

सध्या त्याचा अब्दुल कलाम यांच्या वेशातील लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. त्याच्या एका चाहत्याने हा फोटो व्हायरल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोवरूनच अनेकांनी अंदाज लावला आहे कि, सुरिया आगामी काळात देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित एखाद्या बायोपिक चित्रपट काम करणार आहे. सुत्रांनुसार, सुरिया ‘मिसाईल मॅन’ एपीजे अब्दुल कलाम यांची भूमिका साकारणार आहे आणि या भूमिकेसाठी तो मेहनत घेतोय. त्यामुळे आता सुरियाच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी आणखीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.