DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वितरकाने शेतकर्‍यांना शासकीय सिंचन योजनेचा जास्तीत जास्त लाभ उपलब्ध करून द्यावा – श्रीराम पाटील

जळगाव | प्रतिनिधी

व्यवसायात प्रामाणिक राहून जबाबदारीने काम केल्यास वितरक पुरता मर्यादीत न राहता त्यांची वाटचाल उद्योजकतेची होईल त्यासाठी श्रीराम उद्योग समुह आपणास संपूर्ण सहकार्य करेल. मात्र हे करत असतांनाच आपण इतर कोणाच्या यशाची लाईन पुसायची नाही. श्रीराम ठिबक हे उत्तम गुणवत्ता, माफक दर,वेळेत मालपुरवठा, विक्री पश्चात निरंतर तत्पर सेवा तसेच कुशल, अनुभवी, विश्वासू सहकारी व चाणाक्ष वितरक याच्या पाठबळावर कंपनी आज देशातील शेतकर्‍यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. याचा मला व श्रीराम परिवाराला सार्थ अभिमान आहे.
शेतकर्‍याला विक्रीपश्चात दिलेल्या तत्पर सेवेने तो तुम्हाला दहा शेतकरी ग्राहक मिळवून देतो. याच अनुभवातून तुमची वाटचाल उद्योजकतेकडे होइल यात शंका नाही, असे श्रीराम पाटील संस्थापक अध्यक्ष श्रीराम उद्योग समुह यांनी व्यक्त केले. कृषी दिनानिमित्ताने कंपनीच्या जळगाव व विदर्भ जिल्हयातील वितरकबंधूंचा स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक प्रमोद पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, सीईओ सतिष शेकडे, संचालक अभिजित पाटील, एरिया सेल्स मॅनेजर संजय पुनोतकर, सोनवणे व सुहास गायकवाड उपस्थित होते.
श्रीराम पाटील म्हणाले की, शासनाने शेतकरी हितासाठी ठिबक सिंचनाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना देण्यासाठी आपणास शेताच्या बांधावर जावे लागणार व तेथेच ऑनलाईन अर्ज भरून घेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा लागणार आहे. हे काम जेवढे जबाबदारीने कराल तेवढा शेतकरी सुखी आणि समृध्द होईल आणि पर्यायाने तुमची वाटचाल वितरकाकडून उद्योजकतेकडे होईल. श्रीराम ठिबकचे वितरक प्रमाणिकपणे काम करत असल्याचे ही ते अभिमानाने सांगतात.
व्यवसाय वाढवा व आनंद मिळवा : सीईओ सतिश शेकडे यांनी आनंद योजना जाहीर केली. या योजनेत वितरकांना कंपनीने दिलेले विक्री उद्दिष्टे पुर्ण केल्यास वा त्यापेक्षा अधिक केल्यास त्यांना कंपनीच्या विशेष योजनांचा लाभ व आकर्षक बक्षीस देण्यात येइल.
यशस्वी होण्यासाठी ध्येयवेडे व्हावे : सत्काराला उत्तर देतांना सुर्यकांत पाटील म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी ध्येयवेडे व्हावे. शेतकरी सुखी तरच आपण सुखी. यशाची भूक ठेवून काम करत राहा. रिस्क घ्या. जे करायचे आहे ते पूर्ण झाले असे चित्र बघून कामास सुरवात करा. बारा वर्षांपूर्वी घेतलेले श्रीराम ठिबक आजही उत्तम काम करत असल्याचे जेंव्हा शेतकरी येवून सांगतो तेंव्हा हीच माझ्या कामाची पावती असल्याचे ते गर्वाने सांगतात. श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनातून आपण नक्कीच उद्योजक होऊ यात शंका नाही.
राजकीय व्यक्तीला व्यावसायीक केले: चंद्रकांत बाविस्कर ः मी राजकीय व्यक्ती असल्याने नेहमी राजकारणात व्यस्त असतो. श्रीराम पाटील यांनी मला व्यवसायाकडे वळवत श्रीराम ठिबकचा डिलर बनवले. डिलर झाल्यानंतर अनेकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. यातून मला सकारात्मक उर्जा मिळली. सकारात्मक स्पर्धा कशी असते याचा अनुभव घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुप्पट विक्री उद्दिष्ट पुर्ततेसाठी चांगली सेवा देणार ः सत्काराला उत्तर देताना शरद गोरेपाटील म्हणाले मी पुढील वर्षासाठी यावर्षीच्या तुलनेत दुप्पट माल विक्रीचे चे लक्ष साध्य करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना अधिकाधिक विक्री व विक्री पश्चात सेवा देवून श्रीराम ठिबकचा उत्तम माल वेळेवर देणार. श्रीराम ठिबकच्या गुणवत्तेबाबत शेतकरी येवून सांगतात तेंव्हा विक्रीचे समाधान होत असल्याचे ते सांगतात.
दुप्पट व्यवसाय करू : सत्काराला उत्तर देतांनां विजय पाटील म्हणाले की मी प्राध्यापकाची नोकरी सोडून श्रीराम ठिबकचा व्यवसायात उतरलो. श्रीराम पाटील साहेबांनी मला व्यवसायातील लहान मोठे बारकावे सांगितले, वेळोवेळी विक्रीचे मार्गदर्शन दिले. याच मार्गदर्शनाने मी या वर्षातील उद्दिष्ट पुर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. या वर्षातील अनुभवातून आगामी वर्षात दुप्पट व्यवसाय करणार असल्याचे ते सांगतात.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले. मेळाव्याच्या व्यवस्थापनाचे सहकार्य वरिष्ठ व्यवस्थापक अनंत बागुल, सहा.व्यवस्थापक श्री. सुरज कोलते, कार्मिक अधिकारी ईश्वर पाटील व सहकारी यांनी केले.

रस्ता थांबत नाही… मग आपण का थांबावे ? 
प्रवास करत असतांना रस्ता कोठेच थांबत नाही, त्यानुसार आपणही न थांबता, न थकता कष्टाचे व प्रामाणिकपणाचे इंधन वापरून प्रवास करावा. व्यवसायात अनेक अडचणी, समस्या येतील, येत रहातील. समस्या आपणास एक नवी संधी येते त्यातून क्रांतीचा मार्गही सापडतो. मेहनत, जिद्द आणि रिस्क व्यवसायात घ्यावीच लागते. तरच तुम्ही सक्सेस व्हाल. आता थांबून चालणार नाही. थांबला तो संपला. आता स्पर्धात्मक युग आहे. या युगात टिकण्यासाठी कामाची गती वाढवावी लागणार असल्याचेही श्रीराम पाटील त्यांनी सांगितले.

कंपनीने दिलेले विक्री उद्दीष्ट पुर्ण केलेले वितरक
1) सुर्यकांत पाटील 2) शरद गोरे 3) विजय पाटील यांचा श्रीराम पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सिका ई बाईक भेट देवून सत्कार करण्यात आला. वितरक सोपान पाटील यांची कृउबा व रावेर पिपल्स बँकेवर तर वितरक चंद्रकांत बाविस्कर यांची खरेदी विक्री संघावर निवडून आल्याने त्यांचाही सत्कार स्नेहमेळाव्यात करण्यात आला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.