सुब्रतो फुटबॉल अंतिम विजेता कोल्हापूर तर उपविजेता नागपूर
जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १७ वर्षातील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप रविवारी झाला असून अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध नागपूर यात खेळला गेला असून कोल्हापूर विभागाने नागपूरचा ५-० ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तृतीय स्थाना साठी नाशिक विरुद्ध पुणे यात सामना झाला असून पुणे संघाने १-० हा सामना जिंकला.
या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा मान नागपूरचा गोलकीपर अनिमेश सोरेन आणि व सर्वातकृष्ट खेळाडू म्हणून कोल्हापूरचा तनवीर अहमद यास ट्रॅक सूट देऊन गौरविण्यात आले.. अंतिम स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नागपूरचा विकास निगथोजन यांना पारितोषिक देण्यात आले.
विजय उपविजय संघांना चषक व पदक
स्पर्धेतील विजयी, उप विजयी व तृतीय संघातील खेळाडूंना तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आली ही पदक व ट्रॉफी तसेच खेळाडूंचे किट जैन स्पोर्ट्स अकॅडमी, गोदावरी फाउंडेशन व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर केतकी पाटील, सुप्रीम इंडस्ट्रीचे जनरल मॅनेजर ज्ञानदेव महाडिक, पिंच बॉटलिग चे जफर शेख शिवछत्रपती अवॉर्ड प्रदीप तळवलकर, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष अनिता कोल्हे ,सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक ताहेर शेख, आमिर शेख,मनोज सुरवाडे व भास्कर पाटील आदींची उपस्थिती होती.
विशेष अतिथी म्हणून कोल्हापूरचे सौरभ भोसले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोपिय आढावा फारुक शेख यांनी सदे केला तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी मानले.