DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेतर्फे मकर संक्रांत निमित्त सामुहिक सुर्यनमस्कार

महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेतर्फे मकर संक्रांत निमित्त सामुहिक सुर्यनमस्कार

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता मेहरुन तलाव जवळील सिद्धार्थ लोन येथे सामूहिक सूर्यनमस्कार घेण्यात आला. हा उपक्रम महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी आमदार राजूमामा भाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योग शिक्षिका डॉ. शरयू विसपुते यांना सुवर्णपदक मिळाल्याने आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षक सुनील गुरव यांनी उपस्थित योगसाधकांना सूर्यनमस्कार सह प्राणायाम आणि योगाचे प्रात्यक्षिके करूवून घेतली. त्यानंतर सुर्यनमस्कार करण्याचे फायदे सांगून मार्गदर्शन केले. दरम्यान महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार राजूमामा भोळे यांचा यांना बारा सुत्री मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमा ५० हून अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष योग शिक्षक सुनील गुरव, महासचिव पांडुरंग सोनार, कोषाध्यक्ष नूतन जोशी, महिला सचिव चित्रा महाजन, सचिव रोहन चौधरी, योगशिक्षिका अर्चना गुरव, योग शिक्षिका डॉ. शरयू विसपुते, योग शिक्षिका सुषमा सोमवंशी यांसह महाराष्ट्र योग शिक्षक संघटना, माऊली योग वर्ग, ओम योगा क्लासेस आणि सन योगा गृप च्या कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.