DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आम्ही पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू – आदित्य ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी 

पाच राज्यातील निकालामध्ये गोवा, उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेला अपयश आले आहे. त्यामुळे या निकालावर आता शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेश आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे. सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये आप पर्याय म्हणून उभी राहिली आहे. बंगालमध्ये तृणमूल पर्याय बनली आहे. तशीच महाराष्ट्रात आघाडी पर्याय बनली आहे. देशात हे पर्याय येत आहेत, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लोकांना विश्वास बसणं गरजेचं होतं. शिवसेना ठामपणे उभी राहील. आता प्रत्येक निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर सीरियसनेस वाढेल. पुढच्या काही निवडणुकात मतांच्या मार्फत दाखवलेला विश्वास वाढेल. ही सुरुवात होती. आधी तीन जागा लढवल्या. आता 11 लढवल्या. अजून लढवू. कधी ना कधी तरी यश येईल. अनेक पक्षांची अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला लढताना त्यांचं अस्तित्व नगण्य होतं. आज ते देशात पसरले आहेत. सुरुवात कुठून तरी करावी लागते ती आम्ही केली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.