DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

 

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्द्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, तसेच या क्षेत्रांतील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रांत काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0 योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 450 बेरोजगारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त होणार असून त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल लिंक वर आपली माहिती / नोंदणी ऑनलाईन सादर करावी.

नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स / जॉब रोल निवडावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा.

गुगल लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeW0am6q-9D-wedbHbknkC7RZ4oOoz53Lx1bq0YfmfYKuu0NQ/viewform?usp=pp_url

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.