एमकेसीएलतर्फे १० वी बोर्ड परीक्षेसाठी स्मार्ट टिप्स कोर्स मोफत उपलब्ध
स्मार्ट टिप्स कोर्स विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी धोरणात्मक
स्मार्ट टिप्स कोर्स विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी धोरणात्मक
जळगाव I प्रतिनिधी
एमकेसीएलकडुन नेहमी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणकीय शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) तर्फे 10 वी बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी स्मार्ट टिप्स कोर्स (परीक्षेची तयारी मार्काची भरारी) सुरू करण्यात आला आहे.
हा कोर्स मोफत आहे. या कोर्समध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल यांसारख्या विषयासाठी मॉडेल उत्तरपत्रिका, उत्तर लेखन कौशल्य, वेळेचे नियोजन आणि सरावासाठी मार्गदर्शन दिले जाते. स्मार्ट टिप्स कोर्स विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी धोरणात्मक अंतर्दृष्टी व प्रभावी टिप्स प्रदान करतो.
यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, उत्तरलेखनातील सामान्य चुका, आणि अभ्यासाच्या आधुनिक पद्धतींवर भर दिला आहे. अधिक माहितीसाठी व या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी एमएस-सीआयटी केंद्रांवर त्वरित भेट द्यावी. असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक उमाकांत बडगुजर यांनी केले आहे.