कोणत्या तोंडाने देऊ तुला मी हाक आता र भुर्या …कोण समजून घेईल माझ्या मनातल्या त्या भावना…
व्रण मिटणार नाही तुझ्या जखमांचे…
पण उपकार हि फिटणार नाही तुझ्या घामाने पिकवून खाऊ घातलेल्या अन्नाचे
राबलास तू दिनरात तुझी बांधली आहे काळ्या आईशी नाळ…कसा गेला रे मला सोडून तू अचानक
सा-याच तुझे जीव के प्राण भेदभाव न करता ज्याला तु बोलतोस तरकारी…
त्या कष्टाने पिकवलेल्या तरकारीवर आता कब्जा कोणकारी
धरणी माय मला सोडून गेलास तू देवदारी
आज एकटा रडतोय तुझ्यापाशी मी ठाई ठाई
तुझ्या कष्टानं झाला सार हिरव रान
तुझ्या कष्टाच्या घामाची नाही कुणा किंमत… तूच सांग कशी करू मी एकटा हिंमत…
फक्त तुझ्याच कुटुंबासाठी धान्य तु पिकव….
भाग पाड सर्वांना याचे भान ठेवायला…
गळाला नाही तुझा घाम तर ताटात नसेल कुणा जेवायला…
दुनिया चालत असेल हि धनावर…
पण आमचा श्वास चालतो तुझ्या त्या मेहनतीच्या घामावर
शेवटी एकच सांगेल….
देवा!!! द्यायचेच असेल उदंड आयुष्य कुणा एकाला…
तर ते दे या धरणीमातेच्या लाडक्या सर्जा राजाला .