DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कोरोनात पती गमावलेल्या एकल महिलाच्या पुनर्वसनासाठी “वात्सल्य समिती “ व लोक संघर्ष मोर्चा कटिबध्द

अमळनेर:- दि. ८ ऑक्टोंबर २०२१ शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत मिटिंग संपन्न झाली. ह्या मिटिंग मध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी मुद्दे मांडले १)अमळनेर तालुक्यात कोरोना मुळे पती ,मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा ,२)अश्या निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ,निराधार पेन्शन योजना ,तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत २० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत ३)ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यू नंतर कागदपत्र उपल्ब्ध्द नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत ४)एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस “वात्सल्य समितीने “ करावे ५) समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा ६)ज्या महिलांच्या कडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे ७)सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाणे सर्वाना ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे , ८)तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी
आजच्या बैठकीत तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांच्या सोबत , ग्रामविकास अधिकारी ,लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा ताई शिंदे ,कार्यकर्ता सुप्रिया चव्हाण ,तेजस्विता जाधव यांच्या सह कोरोना मुळे विधवा झालेल्या एकल महिला व अमळनेर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री प्रा अशोक पवार सर, संदिप घोरपडे सर, पन्नालाल मावळे, बन्सिलाल भागवत, रणजीत शिंदे, नरेंद्र पाटील, भारती गाला, वंदना पाटील, संजय पवार, रेणुप्रसाद, शांताराम सोनवणे, बालीक पवार, कलिंदर तडवी, रियाजुद्दीन शेख, रज्जाक शेख किरण पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते .ह्या वेळी तहसिलदारांनी गावनिहाय सर्व्हे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनींग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर १५ दिवसातून एकदा मिटिंग घेण्याचे आश्वासन देत मिटिंग सर्वांचे आभार मानत संपन्न झाली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.