जामनेर पंचायत समितीच्या अधिकारांचा निरोप समारंभ उत्साहात
जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टे
जामनेर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.बी. पाटील (अन्ना) व बांधकाम विभागाचे अधिकारी घोडकेराव साहेब यांनी आज रोजी आपल्या सेवेला विराम दिला असून झालेल्या कामाला व तसेच पंचायत समिती मधे मनापासून आपले वर्चस्व प्रस्थापित करून व सर्वाच्या ह्रदयात जागा बनवून सर्व झालेल्या कामांना आज रोजी निरोप देत आहे.
निरोप समारंभाचा कार्यक्रम पंचायत समिती मिटींग हाँल मधे नुकताच पार पाडण्यात आला. या कार्यक्रमामध्ये के.बी अन्नांच्या सहभागात सहपरिवार सह कुटुंब आई,पत्नी दोन मुले,सून असा सुखी परिवार अन्नांचा उपस्थित होता . यावेळी अन्नांच्या मोठ्या मुलाने वडिलां विषयी आपले मनोगत अश्रूंनी व्यक्त केले.
या निरोप समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधना ताई महाजन,जे.के चव्हाण साहेब,शरद पाटील सर,पिठोडे अन्ना,नवल पाटील, पंचायत समितीचे बि.डी.ओ साहेब, विस्तार अधिकारी पालवे साहेब,बैरागी साहेब,राठोड साहेब,
घोडके राव साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणजे जावळे साहेब,जी.व्ही पाटील,हे होते.जणू कशी अमर अकबर अँथनी ची जोडी,
तसेच या ठिकाणी डॉ. वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे,गट शिक्षण अधिकारी लोहार साहेब, सरोदे साहेब,व के.बी.पाटील (अन्ना),घोडके राव साहेबांवर प्रेम करणारे जामनेर तालुक्यातील सरपंच,नितू ठाकूर,युवराज पाटील, राजमल भागवत, सुधाकर सुरवाडे,बाळू धुमाळ, बाळू चव्हाण,ग्रामसेवक,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बांधकाम विभागातील कार्यक्षम घोडके साहेब व पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के . बी.अन्ना (पाटील)यांनी भरपूर वर्षे सेवा करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सेवापूर्ती निमित्ताने त्यांच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अभियंता सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने जामनेर पंचायत समिती येथे उपस्थित होते. सेवापुर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीरितीने घडवून आणण्याचे कार्य केले.व हा कार्यक्रम संपन्न केला.