DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर पाचोरा बोदवड रेल्वे लवकरच नव्या रुपाने धावणार-केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत भाजप पक्षाच्या वतीने बाबाजी राघो मंगल कार्यालय जामनेर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जामनेर शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात हा संवाद कार्यक्रम ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री.गिरीषजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्याद्वारे सामुहिकरित्या बघण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली पाचोरा ते जामनेर ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ९५५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. तसेच जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी डीपीआर मंजूर झाला आहे, अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी जामनेर येथे केली. जामनेर येथे रविवारी दुपारी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रेल्वे अर्थसंकल्पात राज्याला यावेळी सर्वाधिक ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सर्वाधिक कामे राज्यात केली. विमानतळांसारखी चकचकीच रेल्वे स्थानक करावयाची आहेत. खान्देशातून पुण्यासाठी नवीन गाडी सुरु करण्याची मागणी काही जणांनी केली. त्यावर राव साहेब दानवे म्हणाले की, पॅसेंजर चालविणे हे सर्वात तोट्याचे काम आहे. तुम्ही मागणी करुन तुम्ही तर मोकळे झाले, मात्र नविन गाडी सुरु करणे जिकीरीचे झाले आहे. जालना - जळगाव नवीन मार्गामुळे खान्देश हा दक्षिण भारताशी जोडला जाईल, असेही दानवे यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन व भाजपा कार्यकर्तेंच्या वतीने फुल हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात काहींनी भाजपात प्रवेश केलेला असून आज जामनेर येथे मा. ना.केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. रावसाहेब दानवे व लोकप्रिय नेते व ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. गिरीश भाऊ महाजन यांचा नेतृत्वाखाली गारखेडा गावातील ३५ ते ४० कार्यकर्त्याचा ,अमोल पाटील यांच्या सह व त्यांच्या मित्र परिवाराचा भाजपा मध्ये प्रवेश केलेला असून गारखेड्यातील अमोल पाटील यांच्यासह मित्र परिवारांनी पक्षात प्रवेश करत जल्लोष करीत आनंद साजरा केलेला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकरे, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ डॉ.राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश (राजुमामा) भोळे , खा. रक्षाताई खडसे , खा.उन्मेष पाटील , आ.संजय सावकारे , आ.मंगेश चव्हाण , माजी आ.चंदूलाल पटेल , माजी आ.स्मिताताई वाघ , जामनेर नगराध्यक्ष सौ.साधनाताई महाजन , जामनेर तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत बावस्कर , तुकाराम अप्पा निकम , छगन दादा झाल्टे , शिवाजी नाना सोनार , दिलीप खोडपे सर , जिल्हा चिटणीस नवल राजपूत , शहराध्यक्ष आतिष झाल्टे , भाजयुमो अध्यक्ष निलेश चव्हाण , उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर , शरद पाटील सर , जे के दादा चव्हाण , तालुका सरचिटणीस आंनद लव्हरे , रवींद्र झाल्टे , जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे , नंदू महाजन , भाजयूमो तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण सर , माजी जि.प. सभापती जयपाल बोदळे , जि. प. सदस्य विलास बापू , अमित भाऊ देशमुख , सुनीता ताई पाटील , नामदेव मंगरूळे , तसेच सन्माननिय सर्व नगरसेवक , तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी , लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.