Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
जामनेर : प्रतिनिधी
देऊळगाव गुजरी येथून राज्यमार्ग क्रमांक १८८ वर जामनेर ते धामणगाव बढे बालाजी ट्रॅव्हल्स कायमस्वरूपी प्रवासी फेऱ्या मारत असते. ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच .२१ बी .एच .०६४७ या ट्रॅव्हल्स ने आज दि. ४ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास भरधाव वेगाने धामणगाव बढे कडून जामनेर जात असताना देऊळगाव गुजरीत कापुसवाडी फाट्याजवळ दोघे भाऊ शाळेत जात असताना भरधाव ट्रॅव्हल्स ने दोन चिमुकल्यांना जबर धडक दिली. तर ड्रायव्हर साईडने मागच्या चाकाखाली आल्यामुळे दोघेही बालके गंभीर जखमी झाल्यामुळे रियान नशीब तडवी वय ५ वर्ष तर दुसरा मुलगा आयान नशीब तडवी वय ३ वर्ष दोघांनाही बुलढाणा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान दुर्दैवाने आयान नसीब तडवी वय ३ वर्षे या बालकाचा मृत्यू झाला. तर मात्र त्याचा मोठा भाऊ जखमी असून प्रकृती चांगली असल्याचे समजते. गेल्या वर्षभरापासून जामनेर देऊळगाव राज्यमार्ग क्रमांक १८८ चे काम सुरू असूनआता रस्ता रुंदीकरण व नवीन तयार झाल्याने अनेक वाहने भरधाव वेगाने वाहतच असतात. मृत बालक आयान नसीब तडवी याच्या मृत्यूने गावातील वातावरण चांगलेच तापले होते. संतप्त जमावाने ट्रॅव्हल्स तोडफोड करून आक्रमक पवित्रा घेतला होता. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशन चे पी. आय.अरुण धनवडे तसेच पाचोरा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांनी पथकासह घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ट्रॅव्हल्स गाडी चालक व वाहक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून मृतकाच्या नातेवाईक उपस्थित जमावास देण्यात आले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.