धक्कादायक…..नराधम बापाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार…
( वृत्तसंस्था ) – ‘ तू वयात आलीस का बघायचंय ‘ म्हणत 45 वर्षीय नराधम बापाने 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला
कोणाला सांगितले तर जीवे मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही महिने हा प्रकार सुरु होता, मात्र पीडितेने आपबिती सांगितल्यानंतर नराधम बापाला वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली.
नराधम बापाने मुलीचे कपडे काढून तिच्यासोबत जबरदस्तीने संभोग केला. तू कोणाला सांगितलेस, तर जीवे ठार मारेन, अशी धमकी देत बापाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या लैंगिक अवयवांना वारंवार हात लावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन बापाने केल्याचं समोर आलं आहे.
दुसरीकडे, मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड येथील भाड्याच्या घरात 44 वर्षीय नराधम पत्नी आणि सहावर्षीय सावत्र मुलीसोबत रहात होता. मुलीची आई बाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडित मुलीला अमानुष मारहाण करुन तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीचे चटके देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करायचा.
पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने जवळपास सहा महिने होत असलेले अमानुष कृत्य तिने कोणालाच सांगितले नाही. परंतु, या प्रकाराची माहिती परिसरातील स्त्रियांना कळताच त्यांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची समजूत काढली आणि घडत असलेला प्रकार विचारला. काही वेळाने धीर आल्याने चिमुकलीने आपला सावत्र बाप आपले कसे शोषण करत होता, याचा पाढाच वाचला. कसा आपला नराधम सावत्र पिता माचीसचे चटके देत होता आणि आपल्या गुप्तांगावर मेणबत्तीने चटके देऊन बलात्कार करत होता याची माहिती दिली.