भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्ण संधी !
भारतीय हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात एकूण ३१७ विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.
एकूण जागा : ३१७
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
१) फ्लाइंग
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
२) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
३) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स) NCC स्पेशल एंट्री
४) फ्लाइंग
शैक्षणिक पात्रता : फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयाची अट:
फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹250/-
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
पगार : ५६,१०० ते १,७७,५००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : १ डिसेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० डिसेंबर २०२
अधिकृत संकेतस्थळ : indianairforce.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा