भीषण अपघात तीन जिवलग मित्रांचा मृत्यू..
अहमदनगर : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घटना घडली आहे.
याबाबत असे कि, राहुल सुरेश आळेकर वय 22,केशव सायकर वय 22,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय 18 हे तिघे मित्र कारमधून श्रीगोंदा येथून काष्टीकडे जात असताना ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. या घटनेत कार मधून प्रवास करणाऱ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे.
ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार धडकून तिघांचा मृत्यू झाल्यानं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी अपघातावेळी तातडीनं बचावकार्य करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तिघांचा मृत्यू झाल्यानं गावकऱ्यांना धक्का बसलाय.