दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : तुम्ही देखील सरकारची मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरू करणार असाल तर 15 डिसेंबरपर्यंत तुम्हाला आहे. त्यानंतर या कर्जाच्या व्याजावरील विशेष सवलत बंद होईल. वास्तविक, ज्या लोकांना नवीन कल्पनांसह आपला रोजगार सुरू करायचा आहे, ते मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घेऊन आपली स्वप्ने साकारू शकतात.
मुद्रा योजना हि योजना मोदी सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केली होती. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत , देशातील तरुणांना बँकांकडून हमीशिवाय कर्ज दिले जाते, जेणेकरून ते रोजगार प्रदाता बनू शकतील. मुद्रा योजना मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात. शिशु मुद्रा कर्ज (रु. 50,000 पर्यंत), किशोर मुद्रा कर्ज (रु. 50,001 ते रु. 5 लाख) आणि तरुण मुद्रा कर्ज (रु. 5,00,001 ते रु. 10 लाख) दिले जातात.
शिशू लोनचे सर्वाधिक वितरण : देशात सर्वाधिक शिशू लोन मुद्रा योजनेअंतर्गत वितरित करण्यात आली आहेत.सुमारे 88 टक्के शिशू लोन देण्यात आले आहे.शिशू लोन अंतर्गत, कमाल 50,000 रुपये कर्ज उपलब्ध आहे.विशेषत: छोटे व्यावसायिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे या लोनवर आतापर्यंत विशेष सूट देण्याची तरतूद चालली आहे. ज्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर पर्यंत आहे.
पीएम मुद्रा च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 2 टक्के व्याज सवलत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 15 डिसेंबर ही अंतिम तारीख दिली आहे. 31 डिसेंबर 2021 पासून PMMY पोर्टल व्याज सबव्हेंशन स्कीम (ISS) दाव्यांसाठी बंद केली जाईल. अशा परिस्थितीत, शिशू कर्जाचे कर्जदार 15 डिसेंबरनंतर 2 टक्के व्याज सवलत योजनेसाठी हकदार नसतील.
विशेष असं आहे की PMMY हे एक राष्ट्रीय मिशन आहे, ज्याचा उद्देश स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज देणे आणि लहान उद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.