DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शिरूड परिसरात पावसाने पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई लवकर द्या

अमळनेर :- तालुक्यामधील शिरूड परिसरात मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या सलग चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून नुकसान मात्र झाले आहे

अमळनेर तालुक्यातील शिरूड परिसरात चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहिला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. मातीच्‍या घरांच्‍या भिंती पडल्‍या असून, यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. घरांची पडझड झाल्यामुळे नागरिकांचे झालेल्या नुकसानी संदर्भात गावातील तलाठी प्रशासनातर्फे पाहणी झाली असता. नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.