अकरावीच्या ‘सीईटी’ परीक्षा नाेंदणीसाठी आज अंतिम मुदत
जळगाव | प्रतिनिधी
अकरावी परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी सीईटी परीक्षा घेतली जाणार अाहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी सोमवार (ता.२) पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र, सीईटीचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे बंद झाल्याने ही प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली होती. अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सीईटी परीक्षेसाठीची संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यात आले असून ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश अर्ज केलेले नाही, त्यांनी २ ऑगस्टपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे अावाहन मंडळातर्फे करण्यात अाले आहे. https:/cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध अाहे.
सीईटी परीक्षेसाठी ई-मेल अायडी उपलब्ध नसल्यास मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य अाहे. सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी विद्यार्थ्यास अन्य एक माध्यम निश्चित करावे लागेल. सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रक्रिया करून मंडळाकडे अर्ज केला अाहे. त्यांना अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अावेदनपत्र भरताना नोंदवलेला मोबाइल क्रमांक टाकावा लागणार आहे.