DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बालदिनानिमित्त भाऊंच्या उद्यानात रंगणार बालप्रतिभेचा ‘उमंग तरंग आविष्कार

जळगाव : बालदिनाचे औचित्य साधून अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतन आणि माणुसकी सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भाऊंचे उद्यान येथील अ‍ॅम्फीथिएटरमध्ये ‘उमंग तरंग’ हा बालदिन विशेष सोहळ्याचे आयोजन केले आहे.

बालकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि बालपणातील आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक व कलात्मक सादरीकरणे होणार असून बालप्रतिभेचा रंगतदार आविष्कार अनुभवता येणार आहे. या सोहळ्याला खासदार स्मिता वाघ, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, माजी महापौर सीमा भोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. योगिता बाविस्कर, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या (SID) सहाय्यक आयुक्त नीता कायटे, अभिनेत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या गीतांजली ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या निमंत्रक अनुभूती बालनिकेतनच्या संचालिका अंबिका जैन, माणुसकी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभदा नेवे, अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांनी नागरिकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.