DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डिजिटल मीडियासाठी आनंदाची बातमी; शासकीय जाहिरातींसाठी मार्ग मोकळा

मुंबई : महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाशी संबंधित संपादक व पत्रकारांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून, डिजिटल चॅनल्स आणि वेब पोर्टल्सना अधिकृत राजमान्यता देण्यासह शासकीय जाहिराती देण्यासह परिपत्रक ३ जून रोजी जाहीर करण्यात आले आहे.

या निर्णयामागे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचे नेतृत्व आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. गेली सहा वर्षे ही संघटना राज्य शासन दरबारी सातत्याने मागणी करत होती.

या निर्णयाचा फायदा राज्यभरातील ग्रामीण व शहरी भागातील हजारो डिजिटल पत्रकारांना होणार आहे. संघटनेने २०१९ पासून शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याचे फलित अखेर आता मिळाले आहे.

भिलार (महाबळेश्वर) व कनेरी मठ (कोल्हापूर) येथे झालेल्या महाअधिवेशनांदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (सध्याचे उपमुख्यमंत्री), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

राजा माने यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल सर्व संबंधित नेत्यांचे आभार मानले आहेत.

१२ हजारांहून अधिक सदस्य असलेल्या देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पत्रकार संघटनेच्या या यशामुळे महाराष्ट्रातील डिजिटल पत्रकारितेच्या इतिहासात एक क्रांतिकारक पाऊल उचलले गेले आहे.


बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.