DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘हर घर तिरंगा’ व अन्य अभियानांसाठी भाजप कार्यशाळा

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम, पूर्व व जिल्हा महानगर यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा’, रक्षाबंधन आणि विभाजन विभिषिका स्मृती दिन या अभियानांनिमित्त जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा शहरातील बळीराम पेठ येथील ब्राह्मण सभा हॉल येथे पार पडली.

या कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रावेर लोकसभा प्रमुख नंदुभाऊ महाजन, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकीताई पाटील, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी आमदार दिलीप वाघ, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, महानगर जिल्हाध्यक्ष भारतीताई सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यशाळेचे खास आकर्षण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांचा भाजप प्रवेश. त्यांच्या सोबत जिल्ह्यातील इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपमध्ये सहभागी झाले. कार्यशाळेला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.