DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांच्या शिधापत्रिकेसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात ई-श्रम कामगारांची ५८ जोजार ६३२ संख्या

स्थलांतरीत, असंघटीत कामगारांच्या शिधापत्रिकेसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात ई-श्रम कामगारांची ५८ जोजार ६३२ संख्या

जळगाव प्रतिनिधी राज्य शासनामार्फत ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. शासनाकडून एकूण 76,875 ई-श्रम कामगारांची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय, जळगाव या कार्यालयास प्राप्त झालेली आहे.

प्राप्त माहिती ही तालुकानिहाय वितरीत करण्यात आलेली आहे. त्यापैकी यादीमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध नसलेल्या कामगारांची संख्या 18,243 एवढी आहे. शासनाकडून प्राप्त व उपलब्ध माहितीनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या ई-श्रम कामगारांची संख्या 58,632 एवढी आहे. त्यापैकी 51,302 इतक्या कामगारांसोबत संपर्क करण्यात आलेला आहे. तसेच 7330 कामगारांशी काही अडचणींमुळे संपर्क होवू शकलेला नाही.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या परंतु रेशनकार्ड नसलेल्या कामगारांनी आपल्या नजीकचे तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे. यामुळे त्या कारगारांना शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार आहे. कामगारांनी नवीन शिधापत्रिकेकरीता आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. तसेच, ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे अशा कामगारांनी त्यांच्या शिधापत्रिका प्रकाराची माहिती नजीकच्या तहसिल कार्यालयात द्यावी जेणेकरून शासनास आपली माहिती कळविता येईल. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.