पाचोरा | प्रतिनिधी
पिंपळगाव (हरेश्वर) परीसरात होणा-या चो-या तसेच घरफोडी चो-या या पोलिसांच्या तसेच नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. त्यासंदर्भात पोलिस अधिक्षक जळगाव प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे तसेच पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी अशा प्रकारच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
तसेच दि. ४ आॅगस्ट रोजी रात्री पिंपळगाव (हरेश्वर) येथील जिओ सर्विस सेंटर येथे घरफोडी चोरी झाली होती. त्यात २ लाख १२ हजार रूपयांचे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट राऊटर इत्यादी सामान चोरी गेले होते. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी भेट देउन महत्त्वाच्या सुचना दिल्या त्यानुसार तपास सुरू करून पोलिस स्टेशन पिंपळगाव (हरेश्वर) येथील प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार, पोलिस काॅन्स्टेबल रणजित पाटील, गोकुळ सोनवणे. पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, अमोल पाटील, पोलिस शिपाई जितेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम, संभाजी सरोदे, पोलीस शिपाई पंकज सोनवणे यांचे एक पथक तयार करून त्यांचेकडे सदर प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी सोपविली. व सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना दिल्याने सदर प्रकारच्या गुन्हयांचे घटनास्थळाचे आजु बाजुचे परीसरातील सी. सी. टी. व्ही.ची पाहणी केली असता तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने राहुल दिगंबर राउतराय रा. निंभोरी ता. पाचोरा व किरण बल्लु पवार या आरोपींचा शोध घेवून मोठ्या शिताफीने त्यांना अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल त्यात १ लॅपटॉप, ५ टॅब, जिओ कंपनीचे मोबाईल, १ इंटरनेट राऊटर असा एकुण २ लाख १२ हजार ४३५ रूपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे ५ दिवसापुर्वीच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दाखल दोन गुन्हे उघडकीस आणुन त्यातील आरोपी शिवानंद दत्तात्रय महाजन यास अटक करून त्याचेकडुन वरील दोन्ही गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला होता.
हे हि वाचा…
सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी
“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”
सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे तसेच पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन पिंपळगाव (हरेश्वर) येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार राकेश खोंडे, रणजित पाटील, गोकुळ सोनवणे, पोलिस नाईक पांडुरंग गोरबंजारा, अरून राजपुत, शिवनारायण देशमुख, अमोल पाटील, जितेंद्र पाटील, अभिजित निकम, संभाजी सरोदे, पंकज सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक लक्ष्मण पाटील, विनोद पाटील यांनी केली आहे.