अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन श्रद्धेय भवरलालजींना आदरांजली
जळगाव (प्रतिनिधी) – संगीत ही साधना असते, या संगितातून अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांना विद्यार्थ्यांकडून आगळया वेगळया पध्दतीने ‘भक्ती संगीत संध्ये’ च्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे झालेल्या ‘भक्ती संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, गायिका मैथिली ठाकूर, रिषव ठाकूर, आयाची ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
२५ फेब्रुवारी हा प. पू. भवरलाल जी जैन यांचा स्मृतिदिन श्रद्धावंदनदिन असतो त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ चे आयोजन करण्यात आले होते.
“हे गौरी नंदन तुमको वंदन शंभू सुत…” गणेश वंदना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कृष्ण भजन पेश केले गेले. “कान्हा अब तू मुरली की मधुर धून सुना दे…” “प्रभू जी मुझको भूल गये क्या, रामा रामा रटते रटते बिनी रे उमरिया” या गीता नंतर “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता…” हे गीत सादर करण्यात आले. गायनानंतर तबला सोलो पेश करण्यात आला. अनुभूती निवासी स्कूलचे शिक्षक पं. अमृतेश यांचा मार्गदर्शनाखाली २०विद्यार्थ्यांनी तबला वादन केले. प्रथम त्यांनी तीन तालातील कायदा पेश केला. त्यानंतर रेला सादर करण्यात आला.
मैथिली ठाकूर यांचे ही सादरीकरण
बिहार येथील सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी मराठी अभंग रचना सादर केला. ” अबिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडूरंग…” आणि “मेरे झोपडी के भाग आज जाग जायेंगे, राम आयेंगे” हे गीत सादर केले.भूषण खैरनार आणि निवेदिता मोंडल यांनी हार्मोनियमची साथ दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्याबासरी, कीबोर्ड आणि तबला या तिघांच्या जुगलबंदीने या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभूती निवासी शाळेचा विद्यार्थी क्रिश संघवी याने केले.